Mekh Mogari

Mekh Mogari
Author: रणजित देसाई
Language Marathi
Pages: 112
ISBN10: 8177667416
Genre: Uncategorized
Goodreads Rating: 4.12
ISBN13: 9788177667417
Published: August 25th 2015 by Mehta Publishing House Pune

Marathi : ‘रणजित देसाई यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातावरणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या; सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे. वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादिष्ट पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत. रणजित देसार्इंच्या कथांत वावरणाया स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे. रणजित देसार्इंच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पाश्र्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतही स्वप्नमयता वाढावी, अशा तहेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणाया व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणाया अन् आपल्या दु:खात पिचणाया त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...’ – प्रल्हाद केशव अत्रे English: Ranjit Desai's short stories are different than other short stories. They always take place in wondrous situations, almost have an environment as if in a fairy tale. They are not restrained to Maharashtra. They have a vast background, that of whole India. This author literally lives the line, 'India is my country'. The stories are more historical than realistic. Music and romance are the inevitable factors of the stories. The characters are romantic and love to be in their own world, always lost in the dreamy environment. For them, nothing values more than love and art, not even their life. The female characters which meet us through his stories are always beautiful, petite, fragile, willing to sacrifice for love without any hesitation in their minds. He has always penned them down very delicately, whateer their occupation is, be it a singer, a dancer, a prostitute or a housewife. He has always being considerate of the delicate female mind. His stories take us to places far away, make us forget the real world. The background is equally colourful with all the details penned down minutely. This shows his observation skills. Though his stories tend to be more on the wonderous side, the characters are typical human beings.

He has sketched them very realistically so much that we automatically and unknowingly get involved, laughing with their happiness and crying with their sorrows.Pralhad Keshav Atre Courtesy : http://www.mehtapublishinghouse.com/